पिंप्री येथे लसीकरण माेहिम, सा.पोलीस निरीक्षक उमेश बोरसेंची उपस्थिती…

बातमी कट्टा:- पिंप्री ता. शिरपुर येथे आज दि. ०७ रोजी खर्दे प्राथमिक आराेग्य केंद्राच्या वतीने पिंप्री येथील सामाजिक सभागृहात काेराेना प्रतिबंधक लसीकरणाची माेहिम घेण्यात आली. यावेळी ४५ वर्षावरील व्यक्तींना काेविशिल्ड कंपनीची लस देण्यात आली. गावकऱ्यांनी लसीकरण माेहिमेला चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी लसीकरण कार्यक्रम स्थळी थाळनेर पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक श्री. उमेश बाेरसे यांनी भेट दिली. त्यांनी काेराेना नियमांचे पालन, तसेच मास्क, साेशल डिस्टन्स याबाबत पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे यांच्याकडून आढावा घेतला. तर याप्रसंगी श्री. उमेश बाेरसे यांनी गावातील नागरिक व महिला यांनी कुठलीही भिती न बाळगता निसंकाेच जास्तीत जास्त लसीकरण करूण घेण्याचे आवाहन यावेळी केले. तर उपस्थितांना लसीकरणाचे फायदे समजावुन सांगितले. त्यानंतर गावकऱ्यांनी लसीकरणाला उत्तम प्रतिसाद दिला.
लसीकरणासाठी खर्दे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आराेग्य सहाय्यक श्री. साळवे, श्रीमती आर. एस. गिते, श्रीमती पी. एन महाजन, श्रीमती एम. ए. साेनार, श्री. शाकीर शेख उपस्थित हाेते.
तर शिरपुर पंचायत समिती सदस्य श्री. विजय खैरनार, सरपंच प्रविण राजपूत, पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. महेंद्र गिरासे, उपसरपंच संजय काेळी, ग्रामसेवक प्रभाकर भामरे, कृषी सहाय्यक शिवराज माळी, आशा सेविका सरला काेळी, ग्रामपंचायत शिपाई लालसिंग धनगर, माजी सरपंच संजय धनगर, मनाेज राजपूत, धर्मेश राजपूत, भुषण गिरासे, सागर गिरासे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

WhatsApp
Follow by Email
error: