बातमी कट्टा:- कोरोना काळात कोवीड-19 मुळे मृत झालेल्या कुटुंबातील सदस्यांना राज्य व केंद्र शासन मदतीचे आश्वासन करीत आहे.त्यातच राज्यशासनाने पीडित कुटुंबाला मदतीसाठी अहवाल मागविले आहेत. महिला व बाल समाज कल्याण विभागाचे प्रतिनिधी तालुकास्तरावर पाठवून ज्यांनी 1 किंवा दोघीही पालक गमावले असतील अशा पात्र पीडित परिवाराला आर्थिक किंवा पालकत्व ज्या पध्दतीने मदत करणे शक्य होईल ते सर्व पर्याय पूर्ततेसाठी कागदपत्रांची जमवाजमव नातेवाईक करीत आहेत.

दि 7 जून रोजी मा.जिल्हाधिकारी यांच्या दालनात पीडित कुटुंबाला भेटीसाठी बोलावले होते.खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाचे म्हणणे ऐकून घेतले,परिस्थितीची आपबिती जाणून घेतली व कुटुंबाला शासनस्तरावर सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.ज्या कुटुंबाची परिस्थिती एकवेळ जेवणापासून वंचित असेल अशा परिवाराला स्थानिक तहसीलदार, सर्कल, तलाठ्यांना गावात पाठवून रेशन तसेच शासकीय योजनांचे प्रकरण तयार करून तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
दि 7 रोजी कुरखळी गावात पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी रात्री 8 च्या सुमारास तहसीलदार आबा महाजन, सर्कल बागुल , तलाठी योगिता पेंढारकर, सरपंच सीताराम भिल, कुरखळी ग्रामविकास मंचचे योगेश्वर मोरे, पो पा वसंत धनगर, रेशन दुकानदार जगदीश मोरे, आदी उपस्थित होते.
पीडित कुटुंबाला तात्काळ 5 किलो गहू, 5 किलो तांदुळाचे वाटप केले. तलाठी व रेशन दुकानदार यांना शासकीय योजनेचे लाभ होण्यासाठी दस्तावेजांची पूर्तता करणेसाठी आदेशीत केले.