बातमी कट्टा:- अट्टल सराईत गुन्हेगार जेल मधून पेरोल रजेवर सुटून आल्यानंतर पुन्हा त्याने उद्योग सुरु केले आहे. चक्क रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांपैकी एका संशयिताला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.
दि 7 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास रियाज रहेमान अख्तर रा.चाळीसगांव हे मोटारसायकलीने मालेगांव कडुन धुळ्याकडे येत असतांना दोन संशयितांनी रियाज अख्तर यांच्या मोटारसायकलीचा पाठलाग करत रामनगरच्या अलीकडे दोघा संशयितांनी रियाज अख्तर यांना थांबवून फायटरने मारहाण करत रिव्हॉल्व्हर धाक दाखवून एक मोबाईल व 7 हजार रुपये लुटले याबाबत रियाज शेख यांनी तात्काळ धुळे तालुका पोलीस स्टेशनात येऊन तक्रार दाखल केली.घटनेची दखल घेत पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पोसई प्रकाश पाटील, पोहेकॉ प्रविण पाटील,भुषण पाटील, धीरज सांगळे,सुमित ठाकुर,नितीन दिवसे आदींसह तक्रादार रियाज अख्तर यांना सोबत घेत संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली.यावेळी रामनगर जवळ वाहनाने गेले असता तेथे आरडाओरडा करण्याचा आवाज आल्याने पोलीस आवाजाच्या दिशेने पळाले.
यावेळी दोन संशयित एकाला मारहाण करत असल्याचे दिसले.पोलीस घटनास्थळी पोहचताच एक संशयित फरार झाला तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.यावेळी मारहाण झालेल्या इसमाला विचारपूस केल्यानंतर त्याने संदीप जगन्नाथ जाधव रा. झोडगे असे सांगुन सदर दोन्ही संशयितांनी मोटरसायकलीचा पाठलाग करुन रसत्यावर आडवून रिव्हॉल्व्हरचा दाख दाखवून रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेतला व मारहाण केली असल्याचे सांगितले.ताब्यात घेतलेल्या संशयिताला नाव विचारले असता भगवान सिताराम करगड रा.सोनेगांव ता.मालेगांव असे सांगितले त्याच्या ताब्यातील 3 मोबाईल,1250 रुपये रोख रक्कम आणि एक चांदीचे ब्रासलेट व मोटारसायकल जप्त केले.यांनीच रियाज अख्तर यांना लुटल्याचे रियाज अख्तर यांनी सांगितले.
ताब्यात आलेला संशयित हा अट्टल गुन्हेगार असून तो सध्या पेरॉल रजेवर सुटला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.सदरची कारवाई मालेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याने मालेगाव पोलीस स्टेशन तपास करत आहेत.