बातमी कट्टा:- ढगाळ वातावरण निर्माण होऊन विजाचा कडकडाटांचा आवाज सुरु असतांना शेतातील पिकांना पाणी भरण्यातांना अचानक अंगावर विज कोसळल्याने शेतकऱ्याचा जागिच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील ताजपूरी येथील शेतकरी गोपीचंद सुकलाल सनेर वय 55 हे त्यांता आढे शिवारातील शेतात पिंकाना पाणी भरत होते. दुपारी 12 वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होऊन विज कडकडळाट सुरु होता. गोपीचंद सनेर हे शेतातील निंबाच्या झाडाखाली काम करत असतांना अचानक त्यांच्या अंगावर विज कोसळल्याने गोपीचंद सनेर यांचा जागिच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
गोपीचंद सनेर यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी दाखल करण्यात आले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली एक मुलगा असा परिवार होत.