बातमी कट्टा:- आज दुपारी अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन विजेचा कडकडाट सुरु झाला.यावेळी शेतात काम करत असतांना 55 वर्षीय शेतकऱ्याच्या अंगावर विज कोसळून मृत्यू झाला तर शेतातील झाडाला बांधून ठेवलेल्या दोन बैलांवर विज कोसळल्याने बैलांचा मृत्यू झाला आहे.
शिरपूर तालुक्यात आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.तर विजांचा कडकडाट सुरु झाला होता.यावेळी ताजपूरी येथील गोपीचंद सुकलाल सनेर हे शेतात काम करत असतांना त्यांच्या अंगावर विज कोसळल्याने त्यांचा जागिच मृत्यू झाला तर शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथे देखील विज कोसळल्याने दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
वाडी खुर्द येथील शेतकरी पंडित वक्रा धनगर यांनी शेतावरील काम संपवून बैलांना झाडाखाली चारा टाकुन बांधून ठेवले होते.
दुपारी अचानकपणे विजेच्या कडकडाटाला सुरुवात झाली. यावेळी जोरदार आवाज झाला,तेव्हा पंडित वक्रा धनगर यांनी शेतामध्ये जाऊन बघितले असता, त्यांनी शेतात झाडाखाली बांधलेल्या दोन बैलांचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याचे उघड झाले.वाडी येथील तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
मृत पडलेल्या बैलांकडे बघून शेतकरी पंडित धनगर यांना अश्रु अनावर झाले.पोटच्या लेकरा प्रमाणे जपलेल्या बैलांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पंडित धनगर यांना मोठे दुख झाले.नुकताच शेतीचा हंगाम सुरू झाला असून मान्सून पूर्व शेतीचे कामे करण्यासाठी या बैलांची साथ होती.मात्र आता पंडित धनगर यांच्या वर मोठे संकट निर्माण आले आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मदत मदत मिळावी अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.