पुण्यातून संदेश अन् धुळे जिल्ह्यात पोलीस “अलर्ट” !

बातमी कट्टा:- पुण्यातील चिंचवड परिसरातील भोसरी पोलीस स्टेशन अंतर्गत एक 25 लाख रोकड असलेले एटीएमची चोरी झाल्याची घटना घडली. घटनास्थळी पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना सीसीटीव्ही फुटेज मध्ये घटनास्थळी कंटेनर दिसुन आले त्या संशयावरून ते कंटनेर मध्यप्रदेशच्या दिशेने जात असल्याचे समजल्यानंतर धुळे जिल्ह्यातील पोलिस कंटनेरच्या तपासणीसाठी काल दुपार पासून कामाला लागली.धुळ्यापासुन तर महाराष्ट्र-मध्यप्रदेश सिमेपर्टंत पोलीस अलर्ट झाली होती.

बुधवारी दि 9 रोजी पुणे चिंचवड हद्दीतील भोसरी येथील 25 लाख रुपये रोकड असलेले एटीएम मशिनची चोरी झाल्याची घटना घडली.चोरांनी एटीएम कंटेनरमध्ये टाकून चोरुन नेला असल्याचा संशय पोलिसांना आल्याने तेथील पोलिसांनी याबाबत सर्वत्र संदेश जारी केला.सदर कंटनेर मध्यप्रदेश मार्गे जात असल्याचे सांगण्यात आले होते.यामुळे धुळे जिल्हा पोलीस सकाळ पासून अलर्ट झाले होते.मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे जिल्हा पोलीस कामाला लागले.

धुळ्यापासुन तर महाराष्ट्र मध्यप्रदेश सिमेपर्टंत पोलिसांनी ठिक ठिकाणी वाहनांची तपासणी सुर केली.यावेळी धुळे,सोनगीर,नरडाणा,शिरपूर,सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत तपासणी सुरु असतांना शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळ प्राप्त झालेल्या माहिती नुसार शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दुपारी 2 वाजेच्या सुमारास क्रमांक एच.आर .47 B 7461 या कंटेनरला थांबवुन शिरपूर पोलीस स्टेशन येथे आणले.कंटनेर मधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले कंटनेर मधील संपूर्ण ट्रान्सपोर्टींगचा सामान उतरविण्यात आला.मात्र कुठल्याही प्रकारे संशयास्पद वस्तु व रोकड कंटेनर मध्ये मिळुन आली नाही.जिल्हा पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित देखील शिरपूर पोलीस स्टेशन येथे दाखल होऊन वाहनाची तपासणी केरत या प्रकरणाबाबत चौकशी केली.कंटेनर मधील दोघेही राजस्थान राज्यातील खिलजीपूर येथील असल्याचे समजते.

WhatsApp
Follow by Email
error: