बातमी कट्टा:- शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत 18 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना आज दि 11 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरालगत असलेल्या गणपती मंदीर जवळील नाल्या शेजारी असलेल्या शेतात 18 वर्षीय युवतीचा गळफास घेतलेल्या स्थितीत आज दि 11 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला.मयत युवतीच्या हातावर गायत्री नाव गोढल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आले आहे.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,पोलीस उपनिरीक्षक मुरुकुटे यांच्या पोलीस प्रशासन दाखल झाले आहे.मृतदेहाला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.