बातमी कट्टा:- शिरपूर कृषि विभाग मार्फत दि 12 जून रोजी शिरपूर तालुक्यातील पिंप्री येथे सोयाबीनचे मोफत धान्य वाटत करण्यात आले.सावळदे व पिंप्री येथील शेतकऱ्यांना सदर सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले आहे.त्यासोबत बी.बी.एफ यंत्राणे पेरणीचे मार्गदर्शन देखील करण्यात आले आहे.

सदर प्रकल्प सावळदे येथील 8 लाभार्थी व पिंप्री येथील 11 लाभार्थी मिळून दोन गावात राबविन्यात येत आहे.पिंप्री शिवारात सोयाबीन पेरा नगण्य असतो परंतु चालू हंगामात कृषि सहाय्यक शिवराज माळी यांनी पिकांची फेरपालट करने गरजेचे असल्याने त्याचे महत्व शेतकर्यांनी लक्षात घेवून सोयाबीन पिकाला प्राधान्य दिल्याने काही अंशी पिक पद्धतीत बदल पाहायला मिळणार आहेत. सोयाबीन बियाने पेरणी पूर्वी बियाने उगवन क्षमता चाचणी करावे व पुरेसी ओल जमिनीत असल्यावर बीज प्रक्रिया करून बी बी एफ यंत्राने पेरणी करण्याचे मार्गदर्शन कृषि सहाय्यक शिवराज माळी यांनी केले.
यासाठी विवेक सोनवणे,जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी धुळे, अनिल निकुंभ तालुका कृषि अधिकारी शिरपुर,विशाल मोटे, मंडल कृषि अधिकारी,आर डी मोरे कृषि पर्यवेक्षक शिरपुर , यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिति सदस्य विजय खैरनार यांचे हस्ते पंडित राजपूत,राकेश गिरासे, इन्द्रसिंग गिरासे,निकुन पवार,दिलीप गिरासे, महेंद्र सिसोदिया, भोपाल गिरासे,प्रवीण राजपूत, लालसिंग धनगर ई शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाने वाटप करण्यात आले.यावेळी प्रसंगी सरपंच प्रवीण राजपूत,पोलिस पाटील जयपालसिंह गिरासे,कापूस उत्पादक गट अध्यक्ष मनोज राजपूत आदी उपस्थित होते.