बातमी कट्टा:- साक्री तालुक्यातील दानशूर नियमित समाजाप्रती योगदान देणारे प्राथमिक शिक्षकवृंदांनी साक्री तालुका समन्वय समिती च्या आवाहनाला म्हणजेच “चला श्वास देऊया” उपक्रमास भरभरून मदत केली होती.

देि 11 जुन 2021 रोजी त्या निधीतून भाडणे कोविड सेंटरला प्राथमिक शिक्षकांतर्फे 12 व म्हसदी केंद्रातर्फे 2 असे एकूण 14 ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करून साक्री तालुक्याचे तहसीलदार चव्हाण के सो,गट विकास अधिकारी सूर्यवंशी,तथा गटशिक्षणाधिकारी निर्मल सो, तडवी , राजेंद्र पगारे, पवार,यांच्या शुभहस्ते कार्यक्रमात भेट देण्यात आलेत.या प्रसंगी विनोद खैरनार अध्यक्ष प्राथमिक शिक्षक समन्वय समिती साक्री, सुभाष पगारे सरचिटणीस,प्रकाश बच्छाव संचालक ग.स.बॅक धुळे नंदुरबार जिल्हा ,पावबा बच्छाव, अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक संघटना,विलास सोनवणे,अध्यक्ष ग्रेडेड मुख्याध्यापक संघ,जे.यु.पाटील, डी.डी.महाले, विलास उत्तमराव सोनवणे,शरद कानडे,मधुकर देवरे, विनोद भामरे, श्री देवेंद्र देवरे,संतोष शिंदे,अनिल तोरवणे, संदीप नेरे, अरुण खैरनार दिपक कुवर,तुषार ठाकरे, सुभाष देवरे,आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.यु पाटील सर तर आभार प्रकाश बच्छाव सर, संचालक ग.स.बॅक यांनी मानले.