बातमी कट्टा:- येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाचे आश्रयदाते, मुंबई येथील श्री विले पार्ले केळवणी मंडळचे तत्कालीन अध्यक्ष माजी खासदार स्व. मुकेशभाई रसिकलाल पटेल यांच्या स्मृतीदिना निमित्त मंगळवारी दि. १५ जून रोजी सकाळी ९ वाजता आर.सी.पटेल फार्मसी कॅम्पसमधील एस.एम.पटेल ऑडीटोरीअम हॉलमध्ये पटेल परिवार व संस्थेचे संचालक मंडळ व मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करुन स्व. खा. मुकेशभाई पटेल यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी आमदार काशिराम पावरा, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,उद्योगपती चिंतनभाई अमरिशभाई पटेल व मान्यवर यांनी गुलाबपुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली व प्रतिमा पूजन केले.
“हे राम”…….भजन सोबत दु:खमय वातावरणात माजी खासदार स्व्. मुकेशभाई पटेल यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, संचालक बबनलाल अग्रवाल, शिरपूर पीपल्स बँकेेचे चेअरमन योगेश भंडारी, श्री बालाजी संस्थान उपाध्यक्ष गोपाल भंडारी, कमलकिशोर भंडारी, के. डी. पाटील, कैलासचंद्र अग्रवाल, फिरोज काझी, श्रेणीक जैन, वित्त अधिकारी नाटुसिंग गिरासे, शैलेंद्र अग्रवाल, डॉ. सुधीर गुजराथी, राजेश भंडारी, देवेंद्र पाटील, अरुण दलाल, माधवराव पाटील, जाकीर शेख, राजू शेख, सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य डी. आर. पाटील, प्राचार्य डॉ. संजय सुराणा, प्राचार्य डॉ. संजय बारी, संचालिका डॉ. वैशाली पाटील, प्राचार्य डॉ. एच. वाय. देवरे, उपप्राचार्य डॉ. पी. जी. देवरे, उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील, प्राचार्य डॉ. नवीन हासवानी, प्राचार्य डॉ. नितीन हासवानी, गोकुळसिंग राजपूत, भुरा राजपूत, सी. ए. अनुप शिंपी, नितीन गिरासे, श्यामकांत ईशी, संजय चौधरी, भटू माळी, भालेराव माळी, छगन गुजर, राजेंद्र पाटील, बापू थोरात, नितु राजपूत, राजू मारवाडी, श्रीकृष्ण शर्मा, राज देशमुख, विजय तिवारी, ईश्वरलाल शिरसाठ, बिपीन तेले, संजय कोळी, मनोहर देवरे, चंदू गुरव, राजेश सोनवणे, बापू सोनगडे, सलीम खाटीक, अमोल पाटील, जगदीश सोनगडे, विनोद पाटील, स्वीय सहाय्यक अशोक कलाल, बी. डी. शिरसाठ, नवल वंजारी, सुनील जैन, रविंद्र खुटे, नितीन राजपूत यांनीही गुलाबपुष्प वाहून अभिवादन केले.प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्राचार्य आर.बी.पाटील यांनी केले.