तोंडाला प्लास्टिक टेप बांधलेले, अंगावर धारदार शस्त्राने वार असलेल्या अवस्थेत कार मध्ये मृतदेह आढळला..

बातमी कट्टा:- चारचाकी कारमध्ये मागच्या बाजुस प्लास्टिक टेपच्या साह्याने तोडांला बांधलेल्या अवस्थेत अज्ञात मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.मृतदेहावर हातावर, शरीरावर व गळ्यावर धारदार शास्त्राने वार केल्याची प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

मिळलेल्या प्राथमिक माहिती नुसार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरालगत टेलिफोन ऑफीसजवळील महामार्गावर दि 17 रोजी सायंकाळी रस्त्यावर जि.जे 05 टीसी 0017 क्रमांकाची कार बंद अव्सथेत उभी होती.कार जवळ कोणीही नसल्याने संशय गेल्याने पोलिसांना संपर्क करण्यात आला. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन त्या कारची तपासणी कली असता कारच्या मागच्या सीटवर एका इसमाचा मृतदेह आढळून आला.तोंडाला प्लास्टिक टेपने बांधलेल्या अवस्थेत धारदार शास्त्राने शरीरावर वार केल्याचा मृतदेह प्रथमदर्शनी दिसून आले.

पोलिसांनी वाहनाच्या क्रमांक हा गुजरात राज्यातील असल्याने सदर मृत व्यक्ती गुजरात राज्यातील असल्याची संशय असून याबाबत चौकशी केली असता काही एक समजू शकलेले नाही.पोलिसांना त्या कारमध्ये कागदपत्रे मिळुन आले आहेत.अज्ञात व्यक्तीचा अशा प्रकारे खून करून मृतदेह रस्त्यावरील उभ्या कारमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: