कमी वयात मुलीचे लग्न केल्याप्रकरणी आई वडीलांसह 10 जणांविरुध्द गुन्हा…

बातमी कट्टा:- लग्नात वय कमी असतांना देखील मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी मुलीच्या आई वडीलांसह 10 जणांवर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे येथील देवपूर परिसरातील विट्टाभटी भागात दि 22 एप्रिल 2021 रोजी विवाह संपन्न झाला होता.यावेळी मुलीचे वय 16 वर्ष होते.कमी वयात मुलीचे लग्न लावून दिल्या प्रकरणी पोलीस स्टेशनात सुशीलाबाई मोतीराम बागुल वय 52 यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुलीचे आई प्रतिभा वाल्मीक पाटील,वडील वाल्मीक पाटील,भटु भरत पाटील,भरत पाटील,सुनीता पाटील,जयेश पाटील,मायाबाई पाटील,भटु चौधरी,बंटी पाटील आणि पुरोहीत विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: