बातमी कट्टा:- चारचाकी कारमध्ये मागच्या बाजुस प्लास्टिक टेपच्या साह्याने तोडांला बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता यावेळी नवापूर पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेतला असता तो मृतदेह सुरत येथील व्यापारीचा असल्याचे समोर आले होते.मात्र या व्यापारीचा खून कोणी व का केला याबाबत मोठे प्रश्नचिन्ह पोलिसांसमोर उभे होते.अखेर पोलिसांनी वेशांतर करून मोठ्या शिताफीने या खूनामागील संशयितांचा शोध घेत दोन जणांना ताब्यात घेतले आहे.या मृतदेहावर हातावर,शरीरावर व गळ्यावर धारदार शास्त्राने वार केल्याची प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरालगत टेलिफोन ऑफीसजवळील महामार्गावर दि 17 रोजी सायंकाळी रस्त्यावर जि.जे 05 टीसी 0017 क्रमांकाची कार बंद अवस्थेत उभी होती.कार जवळ कोणीही नसल्याने संशय गेल्याने पोलिसांना संपर्क करण्यात आला.घटनास्थळी पोलीस दाखल होऊन त्या कारची तपासणी कली असता कारच्या मागच्या सीटवर एका इसमाचा मृतदेह आढळून आला.तोंडाला प्लास्टिक टेपने बांधलेल्या अवस्थेत धारदार शास्त्राने शरीरावर वार केल्याचा मृतदेह पोलिसांना दिसून आला.मात्र हा मृतदेह कोणाचा व अशा प्रकारे खून करण्यामागील काय हा खून नेमकां कोणी केला याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि नवापूर पोलिसांकडून चौकशी करत असतांना पोलिसांनी वाहनाच्या क्रमांक हा गुजरात राज्यातील असल्याने सदर मृत व्यक्ती गुजरात राज्यातील असल्याची संशय असून याबाबत चौकशी केली असता मृतदेहाच्या खिशात हॉटेलमध्ये ओनलाईन जेवणाची ऑर्डर दिल्याची पावती मिळून आली होती त्यावर मोबाईल नंकर मिळुन आला.त्यावरून सदय मयत ईसम गुजरात राज्यात सुरत येथील घनश्यामभाई सोसायटी येथील भावेशभाई सी.मेहता हे असल्याचे समजल्याने मयत भावेशभाई यांचा भाऊ घटनास्थळी येऊन त्याला खात्री पटली.

पोलिसांकडून या खूनाचा कसून तपास सुरु होता.मयताची ओळख पटल्याने पोलिसांना शोध घेण्यासाठी मदत झाली होती.मात्र मारे कोण व का मारले ? याबाबत पोलीस पथकासभोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.पोलीस त्या रस्त्यावरील सर्व हॉटेलस,पेट्रोल पंप व लॉजेस वरील सी.सी.टी.व्ही कँमेरा तपासणी करण्यात येत असतांना दि 16 रोजी मयत भावेशभाई सोबत 5 ते 6 इसम नवापूर येथील हॉटेल कुणाल येथे प्रवेश करतांना पोलिसांना सिसिटीव्हीत दिसून आले.तर घटनेच्या दिवशी दि 17 रोजी पोलिसांना उरवशा हॉटेल येथे मयत भावेशभाई सोबत 5 ते 6 ईसम दिसून आले.पोलिसांनी तात्काळ सोध सुरु केला.सदर मारेकरी सुरत गुजरात येथील असल्याचे उघड झाले.
नवापूर पोलीस पथकाने सुरत येथे बातमीदारा मार्फत सिसिटीव्ही फुटेज मधील संशयित सुरत नवसारी येथे अवैध तस्करी करणारे व पैसे घेवुन गुन्हा करणारे (सुपारी किलर) असल्याचे समजले.संशयिताचा शोध घेत पोलिसांनी 4 दिवस वेशांतर करुन त्यांचावर लक्ष ठेऊन संशयित आकाश रमेशभाई जोरेवार वय 21 व आकाश अरविंदभाई आड वय 28 रा सुरत यांंना पोलिस पथकाने ताब्यात घेत पोलीस स्टेशन येथे हजर केले असता.अवैध दारूच्या तस्करीच्या व्यवसायातून खून केल्याचे दोघ संशयितांनी सांगितले.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक देवराम गवळी नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बापकर यांच्यासह पोलीस पथकाने करावाई केली आहे.