बातमी कट्टा:- चारीत्र्याच्या संशयावरुन रागाच्या भरात पतीने कोयत्याने पत्नीच्या डोक्यावर आणि गळ्यावर वार करत तीचा खून केल्याची धक्कादायक घटना रात्री 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील मांजरोद येथील योगेश सोमा धनगर वय 30 याने पत्नीवर चारीत्र्याचा संशय घेत रागाच्या भरात राहत्या घरी स्वयंपाक घरात रात्रीच्या सुमरास पत्नी दर्शना योगेश धनगर हीच्या डोक्यावर व गळ्यावर कोयत्याने क्रुरतेने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली.घटनेची माहिती प्राप्त होताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी दाखल झाले होते.यावेळी थाळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक उमेश बोरसे,उपनिरीक्षक नवनाथ रसाळ दाखल होऊन घटनेची माहिती घेतली.

संशयित योगेश सोमा धनगर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची कबूली संशयित सोमा धनगर याने दिली आहे.