2 लाख 58 हजाराची लाच मागणाऱ्या दोन अभियंते लाचलुचपत विभागाच्या ताब्यात…

बातमी कट्टा:- बांधकाम विभागाकडून अंतर्गत मुलींच्या वस्तीगृहाच्या बांधकामाच्या मागील मंजूर कामांचे धनादेश काढण्यासाठी 2 लाख 58 हजाराची मागणी करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन अभियांतांना धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज ताब्यात घेतले आहे.

अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता दिनेश पाटील रा.पारस मंगलकार्यालय मागे धुळे आणि कनिष्ठ अभियंता सत्यजीत गांधीलकर या दोघांनी तक्रारदाराकडून त्याच्या कंपनीच्या मागील मंजुर कामाच्या चेक मंजुरीसाठी 8 जून रोजी उपविभागीय अभियंता दिनेश पाटील व सत्यजीत गांधीलकर याने चेक काढण्यासाठी तक्रारदाराकडे 2 लाख 58 हजाराची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने धुळे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.तक्रारीची शहानिशा करत उपलब्ध पुराव्याच्या आधारे आज धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने उपविभागीय अभियंता दिनेश पाटील याला धुळे येथून तर सत्यजित गांधीलकर याला अमळनेर येथून ताब्यात घेतले आहे.सदर कारवाई लाचलुचपत विभागाचे धुळे पथकाने केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: