बातमी कट्टा:- केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे.यात महाराष्ट्रातील कोणाचे नाव आघाडीवर असणार याबाबत तज्ञांकडून तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.यात एक नाव खान्देश कन्या खासदार डॉ हिना गावीत यांचे देखील घेण्यात येत आहे.खासदार डॉ हिना गावीत यांना देखील संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तरुण महिला खासदार, शिक्षण,राजकारण आदीबाबींचा विचार करता डॉ हिना गावीत यांना संधी मिळु शकते ?अशी शक्यता राजकीय तज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
दोन वेळेस दिग्गज प्रतिस्पर्धींचा केला पराभव…

सन 2014 मध्ये खासदार डॉ हिना विजयकुमार गावीत यांनी नऊ वेळा खासदार म्हणून निवडून आलेले माणिकराव गावीत यांना पराभव करत खासदारकीचा बहुमान मिळविला होता यानंतर दुसऱ्यांदा खासदारकीच्या निवडणूकीत खासदार डॉ हिना गावीत यांनी सात वेळेस आमदार असणारे के.सी.पाडवी यांचा पराभव केला होता.दोन्ही वेळेस दिग्गज प्रतिस्पर्धी असणाऱ्या नेत्यांना डॉ हिना गावीत यांनी पराभव केले होते.
वडीलांचा राजकारणाचा मोठा अनुभव…
डॉ. हिना गावित यांचे वडील माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ विजयकुमार गावीत यांचा राजकारणातील मोठा अनुभव असल्यामुळे त्याचा योग्यपध्दतीने फायदा डॉ हीना गावित यांना झाला आहे.आई कुमूदिनी विजयकुमार गावीत या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत.
उच्चशिक्षित तरुण महिला खासदार…
यात खासदार हिना गावीत यांची तरुण महिला खासदार म्हणून ओळख आहे.उच्चशिक्षित खासदार डॉ हिना गावीत यांनी जे.जे.कॉलेज मधून एम.बी. बी.एस.एम.डी.मेडिसिन चे शिक्षण पुर्ण केले आहे तसेच नंदुरबार येथे देखील एल.एल.बी चे शिक्षण घेतले आहे.
येत्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तार दरम्यान या सगळ्या बाबींचा विचार केला असल्यास खासदार डॉ हिना गावीत यांना शपत विधीसाठी फोन येऊ शकतो असा तर्क वितर्क तज्ञांकडून करण्यात येत आहे.
