भीषण अपघात माय लेकासह बाप लेकाचा मृत्यू, 10 वर्षीय मुलासह 5 जणांचा मृत्यू…

बातमी कट्टा:- भरधाव वेगाने येणाऱ्या दोन मोटरसायकलींचा धडकेत 5 जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यात एका मोटरसायकलवर असणाऱ्या बाप-लेकाचा तर दुसऱ्या मोटरसायकल वर असणाऱ्या माय-लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

नंदुरबार :- मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अमलाद- बोरद रस्त्यावर हा भिषण अपघात घडला आहे.बोरद येथील उमेश शांतीलाल चव्हाण हे सध्या तळोदा येथे राहतात.ते मोटरसायकलीने पत्नी पूजा चव्हाण व आई सुनंदा चव्हाण यांना घेऊन मोटारसायकलीने शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते.तर तळोदा तालुक्यातील तुळजा येथील वडील मदन दिवाळया नाइक,मुलगा अमित दिवाळ्या नाईक व दारासिंग जांभोरे हे तळोदा येथे मुलाच्या आधारकार्ड काढण्यासाठी गेले होते.

काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास चव्हाण कुटुंब मोटारसायकलीने तळोदा येथे जात असतांना तर नाईक कुटुंब तळोदा येथून तुळोजा त्यांच्या गावी जात असतांना अमलाद- बोरद रस्त्यावरील तळवे गावाजवळ दोन्ही मोटारसायकली समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला.

यात एकाच मोटरसायकलवर येणारे तुळजा येथील दारासिंग जांभोरे यांच्यासह वडील मदन नाईक व त्यांचा 10 वर्षीय मुलगा अमित नाईक या तीघांचा जागिच मृत्यू झाला तर दुसऱ्या मोटारसायकल वरील मुलगा उमेश शांतीलाल चव्हाण,आई सुनंदा चव्हाण व पत्नी पूजा चव्हाण यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.यात मुलगा उमेश चव्हाण व आई सुनंदा चव्हाण यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.

WhatsApp
Follow by Email
error: