बातमी कट्टा:- शेतात काम करत असतांना विज पडून 2 मजूरांचा मृत्यू झालाआ तर 2 जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास घडली आहे.

शिरपूर तालुक्यातील कुरखळी गावालगत असलेल्या शेतात चार मजूर उभे असतांना अचानक पाऊस सुरु झाल्याने चार मजूर निंबाच्या झाडाखाली उभे राहीले होते यावेळी अचानक विज कोसळल्याने चारही जणांपैकी, मनोज सुकलाल कोळी वय 25 व सुनिल सुदाम भिल वय 30 या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर समाधान बारकु भिल वय 30 व रवींद्र गुलाब भिल वय 32 हे दोघही जखमी झाले.
कुरखळी गावातील ग्रामस्थांनी तात्काळ चारही जणांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉक्टरांनी मनोज कोळी व सुनिल भिल यांना मयत घोषीत केले आहे.