बातमी कट्टा:- नंदुरबार येथे साखरपुड्यासाठी कुटुंबासह जाणाऱ्या महिलेच्या पर्स मधून 23 हजार रोकडसह सोन्याचे दागिन्यांची चोरी झाल्याची घटना आज दि 12 रोजी सकाळी बसस्थानकात घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज सकाळी 6 वाजता शिरपूर बसस्थानकात एम.एच 20 बी 9120 क्रमांकाची शिरपूर – नंदुरबार एस.टी येऊन उभी राहीली.यावेळी एस.टी मध्ये बसण्यासाठी सर्व प्रवाशांनी दरवाज्याजवळ गर्दी केली होती.यावेळी नंदुरबार येथे भाचाच्या साखरपुड्यासाठी जाण्यासाठी भारती कैलास महाजन या त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत एस.टी.च्या दरवाज्याजवळ येऊन त्या ठिकाणी उभ्या असतांना त्यांच्या पर्स उघडी असल्याचे त्यांना दिसली. त्यांनी पर्स तपासून बघितली असता त्यातील 23 हजार रोकडसह सोन्याचे दागिन्यांची चोरी झाल्याचे समजले त्यांनी चोरी झाल्याचे आरडाओरड केल्यानंतर घटनास्थळी उपस्थितांची चौकशी करण्यात आली यावेळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे शोध पथक घटनास्थळी दाखल होऊन चोरीच्या घटनेची चौकशी करत बसस्थानकातील सि.सी.टी.व्ही कँमेरा तपासण्यात आला. याबाबत पुढील कारवाई सुरु होती मात्र घटनास्थळी कोणीही संशयित अद्याप मिळुन आलेला नव्हता.