हमालाचे वेशांतर करून पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

बातमी कट्टा:- पोलिसांनी हमालाचे वेशांतर करून कृषी उत्पन्न बाजार समितीत पिस्तूल व खरेदी विक्री करण्यासाठी आलेल्या दोन संशयितांना पिस्तूल, जिवंत काडतुस,मोटारसायकलसह शिताफीने ताब्यात घेतले आहे.

आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीसांना धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दोन संशयित पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे आझादनगर पोलिसांनी हमालाचे वेशांतर करून धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सापळा रचला असता तेथे एम.एच 41 एन 7471 क्रमांकाच्या मोटरसायकलीने एक संशयित कृषी समितीच्या धान्य विक्री शेड मधील एका कोपऱ्यात थांबून दुसऱ्या संशयितांशी गप्पा मारत असतांना हमाल बनुन पोलिस त्यांच्याकडे जात असतांना पोलीस येत असल्याचे समजल्याने त्यांनी पळ काढला असतांना पाठलाग करुन पोलिसांनी दोघाही संशयितांना तब्यात घेतले.त्यांचे नाव विचारले असता मोहमद इरफान मोहमद कौसर अन्सारी वय 41 रा.आझादनगर भोईवाडा,मजदीजवळ धुळे व दुसरा संशयित शाहील सतार शहा वय 20 रामदेव बाबा नगर धुळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.यावेळी संशयित मोहम्मद अन्सारी याच्या कडून 15 हजार किंमतीचे एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस,मोबाईल आणि 30 हजार किंमतीची मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदरची कारवाई आझादनगर पोलीस स्टेशनचे पलीस निरीक्षक आनंद कोकरे,सा.पोलीस निरीक्षक भिकाजी पाटील,सुनिल पाथरवट,दगडु कोळी,जयेश भागवत,अतिक शेख,शोएब बेग,रमेश गुरव आदींनी कारावाई केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: