बातमी कट्टा:- सायंकाळी कांदा घेऊन जाणारा ट्रक मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पलटी झाल्याची घटना घडली असून यात ट्रक चालक व क्लिनर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार काल सायंकाळी मुंबई आग्रा-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर गव्हाणे फाटा नजीक हरियाणा मेवाड येथून पुणे मार्गे गुडगाव येथे कांदा घेऊन जाणारा आर.जे 14 जि.जे 9216 क्रमांकाचा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती.चालक साजीद खान व क्लिनर मोशीन खान हे दोघेही जण यात जखमी झालेत.घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी सोनगीर टोलनाका येथील सुमित शिंदे,गोवींदा सोनवणे,बापु पाटील आदींच्या मदतीने टोलनाका रुग्णवाहीकेने चालकाला उपचारासाठी दाखल करण्यात आले.चालकाला झोप लागल्याने ट्रकचा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
