पायी चालत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनपोत ओढून चोरटे पसार…..

बातमी कट्टा:-शिरपूर शहरातील आशीर्वाद हॉस्पिटल जवळ कॉलनी परिसरात नातेवाईक यांच्या कडे साडी देण्यासाठी पायी जाणाऱ्या विद्या विहार कॉलनीतील महिलेची दोन अनोळखी इसमांनी मोटारसायकल वरून येत गळ्यातील मंगळपोत ओढून पसार झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली आहे. असून सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शहरातील विद्या विहार कॉलनीत राहणारी सरोज सुवर्णसिंग राऊळ ही महिला आशिर्वाद हॉस्पिटल जवळ असलेल्या नातेवाईक कडे साडी देण्यासाठी आज शुक्रवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास पायी जात असतांना बडोदा बँक जुनी देना बँक जवळ विना नंबर च्या काळ्या रंगाचा दुचाकीवरून जवळ येत गळ्यातील ५६ हजार रुपये किमतीची १८ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळपोत ओढून भरधाव वेगाने पसार झाले महिलेने आरोडाओरडा केली तोपर्यंत चोरटे घटनास्थळा वरून पसार झाले मंगळपोत लंपास करणारे दोन्ही संशयित मोटरसायकलीने जात असतांनाच सी.सी.टी.व्ही कॅमेरात कैद झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच पीएसआय संदिप मुरकुटे,पोना भारत चव्हाण, पोकॉ नरेंद्र शिंदे पोकॉ बापूजी पाटील, प्रवीण गोसावी आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे. याप्रकरणी सरोज सुवर्णसिंग राऊळ यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढिल तपास पीएसआय संदीप मुरकुटे हे करीत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: