बातमी कट्टा:- शिरपूर- शहादा रस्त्यावर विचत्र भीषण अपघाताची घटना आज रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली आहे.या अपघातात रस्त्यावर दोन मोटरसायकली उभ्या असतांना भरधाव येणाऱ्या कालीपीली वाहनाने धडक देऊन तेथून कालीपीलीने पळ काढला मात्र पुढे जाऊने उभ्या एसटी बसला जाऊन जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे.या अपघातात 10 जण जखमी झाले असून एक जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.यात कालीपीली चारचाकी वाहनाचा समोरील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे दिसून येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 18 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास शिरपूर- शहादा रस्त्यावरील अर्थे गावाजवळ दोन मोटर सायकलींना वरुळ कडे जाणाऱ्या कालीपीली वाहनाने धडक दिली.व अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढत भरधाव वेगाने कालीपीली नेत असतांना अर्थे गावाजवळ पाचोरा- तोरखेडा हि मुक्कामी बस अर्थे येथील कुबेर फिल्टर समोर उभी असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या या कालीपीलीने बसला जोरदार धडक दिली. या विचीत्र अपघातात 10 जण जखमी झाले असून एक जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करत जखमींना शिरपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी तेथेच उभ्या असलेल्या दोन ते तिन मोटरसायकलींचा या अपघातात चुराडा झाल्याचे सांगण्यात येत आहे.हा अपघात इतका भीषण होता की यात संपूर्ण कालीपीली चारचाकी वाहनाचा समोरील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे दिसून येत आहे.या अपघात एका मोटरसायकल चालकाचा मृत्यू झाला आहे. सदर कालीपीली वाहन शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील असुन जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
