राधाकृष्ण नगरी’च्या उत्थानाकडे पहिले खंबीर पाऊल…

परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः ।
परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थमिदं शरीरम् ॥
अर्थात् परोपकारासाठी झाडे फळे देतात, नद्या परोपकारासाठी वाहतात आणि गायी परोपकारासाठी दूध देतात, त्याचप्रमाणे हे शरीर सुद्धा परोपकारासाठीच आहे.

वरील उक्तीप्रमाणेच परोपकाराच्या भावनेने प्रेरित होऊन आणि ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या “सर्वांसाठी घर” या धोरणाला लक्ष्य ठेऊन “स्माईल इन्वेस्टमेंट सर्विसेस प्रा. लि. व स्माईल हाऊसिंग डेव्हलपमेंट प्रा. लि., न्यू पनवेल, नवी मुंबई” स्थित कंपनी शिरपूर शहरात “राधाकृष्ण नगरी” या नावाने ६५० परवडणाऱ्या घरांचा एक भव्य प्रकल्प घेऊन आली आहे. राधाकृष्ण नगरीचा प्रारंभ महाशिवरात्री, मार्च पासून सुरू झाला असून भूमिपूजन १५ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहे.


राधाकृष्ण नगरी हा प्रकल्प मौजे करवंद, ता. शिरपूर, या ठिकाणी होणार असून नियोजित जागेची पाहणी करण्यासाठी दि. २९ जून रोजी खारघर, नवी मुंबई येथील इस्कॉन समूहाचे श्रीमान सामवेद दास आणि त्यांचे सहयोगी सोबत प्रकल्पाचे मुख्य वास्तुशिल्पकार श्री. आमोद नागवेकर (मुंबई) यांनी प्रकल्प साईटला भेट दिली. सोबत कंपनीचे मुख्य संचालक श्री. माधब चौधरी, संचालक श्री. केशब चौधरी आणि सौ. मनीषा पवार उपस्थित होते. तेथे सर्वांनी मिळून वास्तुशास्त्रानुसार आणि आधुनिक सुखसोयींनुसार राधाकृष्ण नगरीचे स्वरूप कसे असावे यावर चर्चा केली.
करवंद ग्रामपंचायत येथे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. देवेंद्र पाटील (दादा) आणि सौ. मनीषा पाटील (सरपंच, करवंद) यांच्या हस्ते इस्कॉनचे प्रभूजी श्रीमान सामवेद दास यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी श्रीमान सामवेद दास प्रभुजींनी गावकऱ्यांना उद्देशून राधाकृष्ण नगरी आणि तिच्यात भविष्यात होणाऱ्या गतिविधींमुळे करवंद गावाचा आणि शिरपूर शहराचा कसा कायापालट होईल यावरही संबोधन केले. माजी उपसरपंच श्री. आनंदसिंग राऊळ, श्री. भाईदास पाटील, श्री. प्रेमसिंग राऊळ, श्री. अरविन्द माहेश्वरी, श्री. माधवसिंग राऊळ व इतर ग्रामपंचायत सदस्यांसोबत ग्रामस्थांनीही राधाकृष्ण नगरीसाठी अतिशय उत्सुक असल्याचे सांगून प्रभुजींचे आभार मानले.
सायंकाळी कंपनीच्या खटाई प्लाझा येथील ऑफिसमध्ये गीता पाठचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात श्रीमान सामवेद प्रभुजींनी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांचे पठन केले आणि मनुष्य जन्माचे अंतिम उद्देश्य भगवद्प्राप्ती असून त्यासाठी भक्तिमार्गाचा अवलंब कसा करावा यावर मार्गदर्शन केले. कलियुगात भक्ती करणे अतिशय दुर्गम आहे, परंतु भक्तिमय वातावरण आणि साधू संतांचे आणि भक्तांचे सान्निध्य व मार्गदर्शन लाभल्यास भक्ती करणे अतिशय सोपे आणि सुगम होऊन जाते. श्रीमान सामवेद दास प्रभुजींनी राधाकृष्ण नगरीत एक भव्यदिव्य राधाकृष्ण मंदिर येणार असून त्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे आणि राधाकृष्ण नगरी एक धार्मिक पर्यटन स्थळ बनेल अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमात कंपनीचे मुख्य संचालक श्री. माधब चौधरी, संचालक श्री. केशब चौधरी आणि सौ. मनीषा पवार, सोबत कंपनीचे सल्लागार अ‍ॅड. श्री. अमोल चौधरी, इंजि. श्री. विजयसिंग पाटील, प्राध्या. श्री. कमलेश कुरणकर, श्री. जितेश पवार, प्राध्या. श्री. मनोज पाटील, आणि श्री. संजीव पाटील उपस्थित होते. कंपनीचे इतर कर्मचारी सौ. वर्षा बडगुजर, गोपाल बोरसे, जगदीश बोरसे, योगेश साळुंखे, राहुल चौधरी उपस्थित होते. कंपनीशी संलग्णित मे. निलकंठेश्वर ट्रेडर्स, न्यू पार्थ इलेक्ट्रिकल्स, ए. एम. जलगाववाला, पटेल हार्डवेअर, गुजरात पेंटस, श्री. रामकिशोर सोनवणे, श्री. मनोज माळी, श्री. जितेंद्र माळी, श्री. कैलास माळी यांसोबत अनेक भाविकांनी गीता पठन या कार्यक्रमास उपस्थित राहून भक्ति सागराचा आनंद घेतला.
राधाकृष्ण नगरीत आपल्या स्वप्नातील घर घेऊन आपण देखील भक्तिमय वातावरणाचा लाभ घेऊ शकता.
तर मग विचार कसला करताय. आपल्या स्वप्नातील घर घेण्याकडे पहिले पाऊल उचला आणि लवकरात लवकर कंपनीच्या ऑफिसला भेट द्या किंवा खालील क्रमांकावर कॉल करा – ०२५६३-२९५८६३.

WhatsApp
Follow by Email
error: