बातमी कट्टा:-पोलिसांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला झाडाझुडपांमध्ये जाऊन थांबले असतांना यावेळी समोरुन वाहन येताच पोलिसांनी शिताफीने त्या वहानाला थांबवत दारुसह दोघे संशितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे पिंपळनेर पोलीस पथकाने पिंपळनेर ते नवापूर कुडाशी रोडवरील पाखरून गावाच्या पुढे 50 मिटर अंतारावर दि 17 रोजी रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या बाजुला झाडे झुडपांमध्ये सापळा रुचून थांबले होते.यावेळी पिंपळनेर कडून ओमनी कार येतांना दिसली पोलिसांनी तात्काळ रस्त्यावर येत बॅटरीचे उजेळात वाहन थांबवायला सांगितले.ओमनी कार थांबल्यानंतर कारमध्ये पोलिसांना दारुचे सिल बॉक्स मिळुन आले पोलिसांनी ओमनी कारसह दोघा संशयितांना पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे आणत संशयित सुचितकुमार हिरामण जगताप वय 33 रा.चौगाव ता.सटाणा व केशव राजेंद्र सोनवणे वय 28 रा.इंदिरानगर मोरेनगर सटाणा या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत दारुसह 1 लाख 34 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदर कारवाई पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्यासह वाय डब्ल्यु पवार,प्रविण मगन सोनवणे,ग्यानसिंग फुगर्या पावरा,दिपक पंडीत माळी आदींनी केली आहे.