लाच स्विकारतांना दोन डॉक्टर ताब्यात

बातमी कट्टा:- केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी प्रत्येकी 1 हजार असे एकुण 2 हजाराची लाच स्विकारतांना दोघांना लाचलुचपत विभागाच्या धुळे पथकाने शिताफीने ताब्यात घेतले असून गुन्हा दाखलचे काम सुरु आहे.

मिळालेल्या माहिती नुसार तक्रारदार हे प्राथमिक आरोग्य केंद्र नरडाणा येथे कनिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत असून त्यांनी एनआरएचएम अंतर्गत केलेल्या कामांचे मानधनाचे 17 हजार रुपयाचे बिल मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे शिंदखेडा तालुका आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग वर्ग 1 डॉ भूषण पंडित मोरे हल्ली मुक्काम भोईग्ल्ली ता शिंदखेडा व वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग वर्ग 1 प्राथमिक आरोग्य केंद्र नरडाणा ,हल्ली मु.दत्त कॉलनी साई मंदीर जवळ धुळे यांनी प्रत्येकी रुपये एक हजार याप्रमाणे मागणी करून दोन हजार रुपयांची लाच स्वतःच्या आर्थिक फायदा करीता स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या धुळे पथकाने रंगेहात पकडले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सदर कारवाई सापळा अधिकारी

पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे,सापळा पथक पोलीस निरीक्षक झोडगे,राजन कदम, शरद काटके, जयंत साळवे, संतोष पावरा, प्रशांत चौधरी, कृष्णकांत वाडीले,भूषण खलानेकर, भूषण शेटे,महेश मोरे,कैलास जोहरे, पुरुषोत्तम सोनवणे,गायत्री पाटील, संदीप कदम,सुधीर मोरे आदींनी केली आहे.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,धुळे,संतोषी माता चौक धुळे.
@ दुरध्वनी क्रं. 02562-234020
@ मोबा.क्रं.9673620333, 9922447946,9657009727

@ टोल फ्रि क्रं. 1064

WhatsApp
Follow by Email
error: