रस्त्यावरून जात असतांना महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावून पसार झालेले चोरटे 24 तासात पोलिसांच्या ताब्यात..

बातमी कट्टा:- घरातील कचरा बाहेर फेकण्यासाठी जात असतांना वृद्ध महिलेच्या गळ्यातील 50 हजार किंमतीची सोन्याची चैन चोरट्यांनी हिसकावून घेऊन दोन चोरटे पसार झाल्याची घटना घडली होती.याबाबत पोलीसांनी 24 तासातच दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

दि 22 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास धुळे शहरातील साक्री रोडवरील कुमारनगर येथील 70 वर्षीय वृद्ध महिला सौ.ताराबाई माधवदास कुडल या घरातील कचरा फेकण्यासाठी बाहेर रस्त्यावरुन जात असतांना अज्ञात अज्ञात दोन चोरट्यांनी गळयातील सोन्याची चैन खेचून हिसकावून चोरटे पसार झाल्याची घटना घडली होती.याबाबत धुळे शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला होता.यावर पोलीस निरीक्षक नितीश देशमुख यांनी शोध पथाकातील श्रीकांत पाटील,भीकाजी पाटील,मच्छिंद्र पाटील,योगेश चव्हाण,कमलेश सुर्यवंशी,निलेश पोतदार,राहुल गिरी, अविनाश कराड, प्रदिप ढिवरे, राहुल पाटील आंदीनी चोरट्यांचा शिताफीने शोध घेत 24 तासाच्या आत या गुन्ह्यातील कैलास बाजीराव वाघ वय 24 व सनी रमेश चव्हाण वय 19 दोन्ही राहणार फुलेनगर मोगलाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: