बातमी कट्टा:- आरटीओ यांच्याकडून तात्काळ ओडीसी वाहनाची परवानगी मिळवून देण्यासाठी शासकीय फी 4 हजार रुपये असतांना आर.टी.ओ एजन्ट(खाजगी ईसम)यांनी तक्रादाराकडून 12 हजाराची मागणी करुन ती स्विकारतांना दोघांना हाडाखेड चेकपोस्ट येथून लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार तक्रारदार यांचा ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय असून त्यांना आर. टी. ओ. चेकपोस्ट हाडाखेडा येथून ओडीसी वाहतूक करण्याची परवानगी मिळवून देण्याकरिता जयपाल प्रकाशसिंग गिरासे,वय 35, खाजगी इसम, (आर. टी. ओ. एजन्ट, हाडाखेडा, चेकपोस्ट ता. शिरपूर, जि. धुळे ) राह. शिरपूर,जिल्हा धुळे. व छोटू भिकन कोळी,वय 34, खाजगी इसम, (आर. टी. ओ. एजन्ट, हाडाखेडा, चेकपोस्ट ता. शिरपूर, जि. धुळे ) राह.पळासनेर, ता. शिरपूर, जिल्हा. धुळे या दोन्ही खाजगी इसमांनी आर. टी. ओ. एजन्ट म्हणून आर. टी. ओ.अधिकारी यांच्याकडून तात्काळ ओडीसी वाहनाची परवानगी मिळवून देण्यासाठी शासकीय फी 4 हजार-रुपये असतांना तक्रारदार यांच्याकडून 12 हजार रुपये स्वतःसाठी व आर. टी.ओ. अधिकाऱ्यासाठी मागणी करून आज दोघा आर.टी.ओ एजन्ट खाजगी ईसमांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.
सदर कारवाई सुनील कडासने पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक, निलेश सोनवणे अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक मा.श्री.सतिष भामरे वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक लाचलुचपत विभागाचे पथक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे,सह सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक साधना इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक पोह. पंकज पळशीकर, पोना वैभव देशमुख, पोना अजय गरुड, पोना प्रभाकर गवळी, चालक संतोष गांगुर्डे आदींनी सदरची कारवाई केली आहे.
