बातमी कट्टा:-उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज रात्री 9 वाजेच्या सुमारास अचानक काही संशयितांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली असून उपमहापौर कुलभूषण पाटील हे घटनेनंतर तात्काळ जवळील रामनंद नगर येथील पोलीस स्टेशनात दाखल झाले.आज दुपारी झालेल्या क्रिकेट खेळण्याच्या दोन गटातील वाद मध्यस्थी केल्याने त्यांच्यावर हा गोळीबार झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

जळगाव मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार पिंप्राळा येथील उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर काही संशयितांनी अचानक गोळीबार केला. यात सुदैवाने उपमहापौर कुलभूषण पाटील हे थोडक्यात बचावले.त्यांनी तात्काळ जवळील रामनंद नगर पोलीस स्टेशन गाठत गोळीबार झाल्याची माहिती दिली.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी हे कुलभूषण पाटील यांच्या निवस्थानी दाखल होऊन चौकशी करत माहिती जाणून घेतली.
कुलभूषण पाटील यांनी दुपारी झालेल्या क्रिकेट खेळाचा दोन गटातील वाद पोलीस स्टेशनापर्यंत पोहचल्यानंतर मध्यस्थी करून मिटवला होता.यातील एका गटाला याचा राग आल्याने त्यांनी शिवीगाळ करत कुलभूषण पाटील यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती.फोन करुन देखील धमकी देऊन शिवीगाळ करण्यात येत होती.रात्री 9 वाजेच्या सुमारास कुलभूषण पाटील हे घरा जवळ जात असतांना त्यांच्या वर अचानक रात्री 9 वाजेच्या सुमारास गोळीबार झाला सुदैवाने ते घरात पळाले मात्र घरावर देखील गोळीबार सुरुच होता.गोळीबारचा आवाज आल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली असता संशयित पसार झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.याबाबत पोलीस घटनास्थळी येऊन चौकशी करत आहेत.