बातमी कट्टा:- भारतीय सैनिक शहीद जवान निलेश महाजन यांचे पार्थिव सोनगीर येथील घरापासून अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले यावेळी जिल्ह्यातील नागरिकांची प्रचंड गर्दी बघावयास मिळाली.
सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास शहीद जवान निलेश महाजन यांचे पार्थिव सोनगीर येथे त्यांच्या राहत्या घरी पोहचले. यावेळी सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.अमर रहे अमर रहे च्या घोषात संपूर्ण सोनगीर गहीवरले होते.वयाच्या 25 व्या वर्षी देशासाठी बलीदान दिलेले शहीद जवान निलेश महाजन यांंचे पार्थिव सोनगीर येथील घरापासून दोंडाईचा रस्त्या जवळील सोमेश्वर महिंदाजवळ अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.प्रशासनाकडून अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी करण्यात आली होती.