बातमी कट्टा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे गुरुवार 5 ऑगस्ट 2021 रोजी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांचा दौरा असा : गुरुवार 5 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह, धुळे येथे आगमन व राखीव, दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे आगमन, दुपारी 2.35 ते 3.15 शासकीय अधिकाऱ्यांसमवेत कोरोना विषाणूमुक्त गावांचा आढावा, दुपारी 3.15 ते 4 वाजेपर्यंत कोरोना विषाणूच्या काळात सामान्य नागरिक, कामगार, शेतकरी, मजुरांना मदत देण्यासाठी शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या योजनांचा आढावा (कृषी विभाग, कामगार विभाग, परिवहन विभाग, रोहयो, आदिवासी कल्याण विभाग, महिला व बालविकास विभाग), दुपारी 4 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, दुपारी 4.30 वाजता धुळे शिवसेना पक्ष कार्यालयाकडे प्रयाण, दुपारी 4.45 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत धुळे शिवसेना कार्यालय येथे आगमन, कार्यकर्त्यांसमवेत चर्चा व शिवसंपर्क मोहिमेचा आढावा, कार्यकर्त्यांशी जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा, सायंकाळी 6.15 वाजता धुळे शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.