बातमी कट्टा:- सत्तेतील पक्ष एकमेकांवर आरोप करत असून प्रशासनात या सरकारची पकड नसल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केली भाजप नेते आज धुळे जिल्हा दौऱ्यावर होते.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला.
आज धुळे येथे भाजपाचे नेते आशिष शेलार हे पत्रकारांशी बोलत होते यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या धोरणांचा चांगलाच समाचार घेतला.ते बोलतांना म्हणाले की
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना पॅकेज नाहीतर प्रत्यक्ष मदत देईल असे आश्वासन दिले होतं, मात्र मुख्यमंत्र्यांनी मदती ऐवजी पॅकेज जाहीर करून, पूरग्रस्तांची फसवणूक केल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला.सत्तेतील पक्ष एकमेकांवर आरोप करत असून, प्रशासनात या सरकारची पकड नाही.
राज्यात ज्या स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाचे सत्ता आहे त्या ठिकाणी विकास निधीला कात्री लावत दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जनतेच्या रोषाला सरकारच्या दरबारी पोहोचवण्याचं काम सक्षम पणे विरोधी पक्ष म्हणून भाजपा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राहुल गांधी आणि संजय राऊत यांची गळाभेट हि उद्याच्या खबरनाम्याची ठळक बातमी असेल , असा चिमटा भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी दोन्ही नेत्यांच्या भेटवर काढला आहे. मुंबई विमानतळावर शिवसेनेनं केलेलं आंदोलनावरही शेलार यांनी टीका केली आहे. समोरून आंदोलन आणि मागून हस्तांदोलन अशी दुटप्पी भूमिका राज्य सरकारची असल्याचा आरोपही त्यांनी यांनी केला आहे.या वेळी शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटी वरती मात्र भाष्य करणे आशिष शेलार यांनी टाळले.
अंजली दमानियांनी यांनी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे ट्विट केले आहे यावर आशिष शेलार यांनी कोण कोणाला भेटतो या त्याच्या व्यक्तींचा त्याचा सन्मानाने त्यांचा प्रश्न आहे केंद्रात बसलेला सत्तेतील मंत्री हे सर्वच नेत्यांना भेटतात हे मला माहिती आहे मी वास्तववादी कार्यकर्ता असल्यामुळे आज मी एवढंच म्हणीन भाजपाच सक्षम विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करेल, अंजली दमानिया यांच्या ट्विटरवर मी कोणतीही भाष्य करणार नाही अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केली
मलंगगड मध्ये एका तरुणाने एका तरुणीला तोकडे कपडे का घातले असा जाब विचारत त्या तरुणीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडल्याची घृणास्पद प्रकार उघड झाला आहे.यावर राज्याच्या माता-भगिनी सुरक्षित नाभीत आणि सुरक्षितता ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे त्यांचा मानसिक खच्चीकरण या राज्य सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांमुळे होत असेल तर मला असं वाटतं राज्याच्या माता भगिनींच्या सुरक्षिततेची जबाबदारी आता कोण घेणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.महाराष्ट्रातल्या माता भगिनींची सुरक्षा करणे राज्य सरकारचे काम आहे असे यावेळी आशिष शेलार यांनी सांगितले.
नांदेड येथील एका होस्टेलच्या उद्घाटना बाबत नवाब मलिक यांनी राज्यपालांवर केलेल्या टीकेबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले नवाब मलिक हे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत हे त्यांनी विसरू नये राज्यपाल हे राष्ट्रपती नियुक्त असून त्यांच्यावर टीका करण्याचा नवाब मालिक यांना कोणताही कायदेशीर मार्ग नाही. त्यांना उद्घाटनाचे निमंत्रण आले असेल तर ते उद्घाटन करतील, नवाब मलिक यांना त्यांच्या पक्षातील कोणी बोलावत नसेल तर त्यांनी त्यांची कोल्हेकुई राज्यपालांवर न करता स्वतःचा अभ्यास करावा अशी टीका त्यांनी यावेळी केली.