शेतीच्या बांधावर जाऊन धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांनी घेतली लाभार्थ्यांची भेट…

बातमी कट्टा:- आज शिंदखेडा तालुक्यातील रेवाडी व धावडे या गावामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या अंतर्गत येणाऱ्या विंधन विहिरीचे भूमिपूजन तसेच पूर्ण झालेल्या विहिरी डिझेल इंजिन इलेक्ट्रिसिटी कनेक्शन ठिबक सिंचन इलेक्ट्रिक मोटार आडवी बोअर इत्यादी लाभार्थींची भेट त्यांच्या शेतात जाऊन अध्यक्षांनी घेतली.

विहिरीचे बांधकाम त्यामध्ये असलेले पाणी व पाण्याचे नियोजन शेतीसाठी व्यवस्थित होत आहे किंवा नाही याबाबत धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांनी शेतीच्या बांधावर जाऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला व तेथील शेतकरी बांधवांची विविध समस्यांवर संपूर्ण चर्चा केली भविष्यात येणाऱ्या शेती उत्पन्नाबाबतची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष रंधे यांनी शेतकऱ्यांकडून घेतली तसेच शेतीसंदर्भात पाण्याची व विजेची अडचण शेतकरी यांनी सांगितल्यावर अध्यक्षांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना आपण ज्या शेतकरी बांधवांना विहीर मंजूर झाली आहे असे प्रत्येक लाभार्थीना सोलर पंप मंजुरी बाबत शासनास प्रस्ताव पाठविण्याबाबत सूचित केले.यानंतर जिप अध्यक्ष रंधे यांनी शेतकरी लाभार्थींचा सत्कार व अभिनंदन केले. यावेळी कार्यक्रमास शिंदखेडा पंचायत समिती सभापती वैशाली अरुण पाटील उपसभापती नारायणसिंग गिरासे जिल्हा कृषी विकास अधिकारी पी एन सोनवणे बीडीओ सोनवणे व एबीडीओ वळवी कृषी जिल्हा कृषी अधिकारी यु.टी गिरासे रेवाडी सरपंच सिंधुबाई रोहिदास पवार बापू पवार आश्रम शाळेचे व्हाईस चेअरमन रवींद्र मालचे माजी सरपंच सुपडू भिल सरदार आखाडे नरेंद्र बोरसे नंदभाऊ वाघ ईश्वर वाघ धावडे सरपंच नवलसिंग गिरासे शामराव भिल मोहन भिल रामानंद जाधव कृषी अधिकारी आर एस कोळी अभय कुवर गिरीधर देवरे तसेच लाभार्थी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषद अध्यक्ष रंधे म्हणाले आज या माझ्या गोरगरीब शेतकरी बांधवांचा बांधावर येऊन मला आनंद होत आहे आपल्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन येथील शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या सक्षम होतांना पाहून मला मनस्वी आनंद झाला आहे भारताचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नाच्या शेतकरी हा आज आपल्याला स्वतःच्या बळावर कष्ट करून उत्पन्न घेत आहे प्रधानमंत्री यांचे स्वप्न आहे जोपर्यंत आपला अन्नदाता सक्षम होत नाही तोपर्यंत आपला देश सक्षम होऊ शकत नाही मागील भाजपा शासित शासनामध्ये जलयुक्त शिवार योजनेमुळे या भागातील विहिरींना 30 ते 50 फुटावर पाणी लागलं आहे.या जिल्ह्यात या सर्व योजना शेतकरी बांधवांपर्यंत पोहचविण्याचे काम मी करणार आहे.

WhatsApp
Follow by Email
error: