“या” भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बालबाल बचावले…

बातमी कट्टा:- अरुणावती नदी पुलावर अज्ञात वानाने धडक दिल्याने चालचाकी कार पुलाच्या कठडेला जाऊन धडकली.हा अपघात ईतका भीषण होता की कार चक्क विरूध्द दिशेला जाऊन फिरली असुन कारचा पुर्णता चेंदामेंदा झाला आहे. सुदैवाने कार पुलाखाली पडण्यापासुन वाचली तर एअरबॅग उघडल्याने चालक किरकोळ जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 6 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास शिरपूरकडून कळमसरे गावाच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी काराचा भीषण अपघात झाला आहे.आज सकाळी एम.एच 05 ईए 9997 ही आय-20 पांढऱ्या रंगाची कार शिरपूरकडून कळमसरे गावाच्या दिशेने जात असतांना अज्ञात अवजड वाहनाने धडक दिली.यात कार नदीपुलावरील कठडेला ठोकली जाऊन विरुध्द दिशेला फिरली.या अपघातात कारचा पुर्णता चेंदामेंदा झाल्याचे दिसुन येत आहे.सुदैवाने कार पुलाखाली पडण्यापासून वाचली.तर कारची एअरबॅग उघडल्याने चालक बालंबाल वाचले.यावेळी उपस्थितांनी कार चालक रामा भारती यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कार चालक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले जात असुन किरकोळ जखमी झाले आहेत.

नशीब बलवत्तर असल्यानेच ईतका मोठा भीषण अपघात झाल्यानंतर देखील चालक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत.विशेष म्हणजे कारने पुलाच्या कठड्यांना धडक देत कठडे तुटले असून कारचा संपूर्ण चेंदामेंदा झाला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: