बातमी कट्टा:- मोटरसायकल चोरी करणाऱ्या संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाने शिताफीने ताब्यात घेतले असून त्या संशयितांकडून एकुण 5 मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे धुळे पथकाचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे पथकाने दि 5 रोजी धुळे शहरातील अलहेरा हायस्कूल जवळ शंब्बर फुटी रोड येथे संशयित सईद खान फिरोज खान वय 28 धंदा मेकेनीकल रा.तिरंगा चौक मशिद जवळ हा स्पेंलडर मोटरसायकल विक्री करण्यासाठी आला असतांना पोलीसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले.त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने मोटरसायकल चोरीची कबुली दिली.पोलीसांनी त्याने चोरी केलेल्या एकुण 1 लाख 50 हजार किंमतीचे 5 मोटरसायकली जप्त केल्या आहेत.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्यासह योगेश राऊत,सुशा़त वळवी, प्रभाकर बैसाणे,श्रीकांत पाटील,संदीप थोरात,संजय पाटील,प्रकाश सोनार,संदीप सरग,योगेश जगताप,किशोर पाटील,मयुर पाटील,तुषार पारधी,चालक विलास पाटील, दिपक पाटील,संजय सुरसे,कैलास महाजन यांनी केली आहे.