बातमी कट्टा:- राज्याच्या आकडेवारी नुसार भंडारा जिल्हा राज्यातील पहिला कोरोनामुक्त जिल्हा तर धुळे हे पहिले कोरोनामुक्त शहर म्हणून जाहीर करण्यात आले आहे.या दिलासादायक बातमीमुळे धुळेकरांकडून समाधान व्यक्त होत आहे.
कोरोनाचा सर्वत्र कहर सुरु होता यात दुसऱ्या लाटेत कोरोनाला रोखण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्यात येत होते.कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असतांना आता मिळालेल्या माहिती नुसार भंडारा जिल्हा हा राज्यातील पहिला करोनामुक्त जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला आहे तर त्याच सोबत कोरोना रोखण्यास यशस्वी ठरलेले तर धुळे हे देखील राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर म्हणून घोषीत करण्यात आले आहे.या दिलासादायक बातमी धुळेकरांच्या चेहऱ्यावर आनंद बघावयास मिळत आहे.
धुळे शहरात कोरोनाचे ऍक्टिव्ह केसेर शुन्य आहेत तर 3 ऑगस्टपासून कुठलीही पॉझिटिव्ह केस आलेली नसुन कोराने मृत्यू देखील झालेली नाही तसेच धुळे शहरात एकही कंटेन्मेंट झोन नसल्याचे सांगण्यात आले आहे.