पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्याकाळी उभारलेले मंदिर…

बातमी कट्टा:- सातपुडा डोंगर रांगेत हिरवाईने नटलेल्या निसर्गरम्य वातावरणात उभे असलेले श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर खान्देशसह गुजरात मध्यप्रदेश राज्यातील भावीकांचे श्रध्दास्थान मानले जाते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळी उभारलेले हे मंदीर

सातपुडा डोंगर रागेत असलेले श्री क्षेत्र श्री नागेश्वर मंदीर हे शिरपूर-चोपडा रस्त्यावर आहे. निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर उभे आहे.या मंदिरात शिरपूर तालुक्यासह खान्देश, मध्यप्रदेश व गुजरात राज्यातून देखील भावीक मोठ्या प्रमाणात दर्शानासाठी येत असतात.अहिल्यादेवी होळकर यांनी त्याकळी या ठिकाणी शिवालय बनवले होते.याठिकाणी असलेल्या पुरातन गोमुखातून अनेक वर्षांपासून अखंडपणे गोडपाण्याचा झरा वाहत आहे.इतिहास साक्षी असलेल्या पुरातन मंदीरात एकेकाळी नागासाधु देखील वस्तीला येत असल्याचे सांगितले जाते.

खर तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी उभारलेल्या या मंदीराकडे मध्यकाळी प्रशासनाने दुर्लक्ष केले होते.मात्र श्री क्षेत्र श्री नागेश्वर महादेव मंदीराचे 1995 साली स्वतंत्र ट्रस्ट उभे राहीले असून श्री नागेश्वर विकास संस्थानच्या वतीने या ठिकाणी मंदीराचे पुरातन कायम ठेवत विविध विकास कार्य येथे करण्यात आले आहे.नव्याने येथे श्री गणपती मंदीर, पार्वतीमाता मंदिर,गुरुदत्त मंदिर,ऋषी महाराज,श्री शंभू महादेवांचे मंदिर बांधण्यात आले आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्याकाळी बांधलेल्या पुरातन मंदीरात श्रावण मासात लाखोंच्या संख्येने भक्त या ठिकाणी दर्शनासाठी यत असतात. मात्र कोरोना काळात दोन वर्षापासून येथे यत्रोत्सव व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.यावेळी देखील येथे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत यात्रोत्सव रद्द करण्यात आले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: