चालत्या ट्रालाचा अचानक टायर फुटल्याने समोरुन येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकला…

बातमी कट्टा:- चालत्या ट्रालाचा अचानक टायर फुटल्याने ट्राला समोरुन येणाऱ्या ट्रकवर जाऊन धडकला.या अवजड वानांच्या अपघातात ट्राला चालकाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळे शहरालगत असलेल्या लळींग घाटात दि. 9 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास राजस्थानकडे जाणारा चारचाकी वाहनांनी भरलेला ट्रॉला क्रमांक आर.जे. 14 जी. एच 7889 या अवजड वाहनाचा लळींग गावाजवळ अचानक टायर फुटला. यामुळे दुसऱ्या बाजूने मुंबईकडे जाणारा लाकडांनी भरलेल्या ट्रक क्रमांक जी. जे. 12 ए. झेड 0353 या वाहनावर ट्रालाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॉला चालक प्रेमभाव गुजर जागीच मृत्यू झाला.या अपघातामुळे महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी मोहाडी उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस दाखल झाले होते. क्रेनच्या साहाय्याने दोन्ही वाहनांना रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली..व त्याठिकाणी वाहनांनी जाम झालेल्या रस्ता तात्काळ सुरळीत केला.

WhatsApp
Follow by Email
error: