तीन पिस्तूल,38 जिवंत काडतूसांसह नाशिकच्या 4 संशयितांना शिरपूर जवळ घेतले ताब्यात…

बातमी कट्टा:– पोलीसांना मिळालेल्या गोपणीय माहितीनुसार मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र 3 येथे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून 4 संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 3 बानवट पिस्तूल 38 जिवंत काडतूसे जप्त केले आहेत.पिस्तूलांसह एकुण 6 लाख 39 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे शिरपूर शहर पोलीसांनी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र 3 वर सापळा रचला होता.यावेळी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट वाहनावर पोलीसांना संशय आल्याने पोलीसांनी वाहन थांबवले व स्विफ्ट कारची झडती घेतली असता त्या तीन बनावट गावठी पिस्तूल व 38 जिवंत काडतूसे मिळुन आली पोलीसांनी स्विफ्ट कारमधील मोहम्मद अन्वर सैय्यद वय 26 रा. नानावली ता.नाशिक,स्वप्निल बाळासाहेब वाघचौरे वय 28,शंकर गल्ली काठ्ठे नगर ता.नाशिक,ईदय अरुण तिडके वय 23 रा.शंकर गल्ली काठ्ठे नगर ता.नाशिक,मोईन रुऊफ खान वय 27 रा.कथडा ता.नाशिक या चारही संशयितांना ताब्यात घेतले.

पोलीसांनी तीन बनावट गावठी पिस्तूल,38 जिवंत काडतूस,5 मोबाईल,रोकड रक्कमसह 6 लाख 39 हजार 750 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर कारवाई शिरपूर पोलीस स्टशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख,पोसई के. आर. बार्हे, हारुण शेख,सतिष वाणी,भरत चव्हाण,पंकज पाटील, योगेश कोळी,बापूजी पाटील,नरेंद्र शिंदे,स्वनिल बांगर, अमित रनमळे,प्रविण गोसावी,मुकेश पावरा,इंद्रसिंग पावरा आदींनी केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: