धुळ्यात शिवसेना-भाजप आमने – सामने पोलीसांचा लाठीचार्ज

बातमी कट्टा:- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री विरोधात केलेल्या बेताल वक्तव्याचे धुळ्यातही पडसाद उमटले.मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात पोलीस स्टेशनात शिवसैनिकांनी तक्रार दाखल केली,यावेळी संतप्त शिवसैनिकांनी मंत्री राणे यांचे प्रतिकात्मक पुतळ्याची अंतयात्रा काढली असता दुपारच्या सुमारास भाजपचे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या कार्यालय जवळून जात असतांना प्रचंड घोषणाबाजी झाली.यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील संतप्त झाले व शिवसैनिकांना भिडले भाजप आणि शिवसेना आमनेसामने येत मोठा राडा झाला.यावेळी दगडफेक देखील झाल्याचे सांगितले जात आहे.मोठमोठ्याने घोषणाबाजी व शिवीगाळ सुरु होती घटनास्थळी पोलीसांचा मोठा फौजफाटा दाखल होत राडा मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला यामुळे मोठा अनर्थ होण्यापासून टळला आहे.या प्रकरणात पोलीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यासह व्हिडीओ वृत्तांत बघण्यासाठी चैनल सबस्क्राईब करा

धुळ्यात केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या मुद्द्यावर शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्तेमध्ये दुपारी चांगलाच राडा झाला. भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने महानगरपालकेसमोर काही काळ चांगलंच तणाव निर्माण झाला होता. दोन्ही बाजूने दगडफेक झाली मात्र पोलिसांनी त्याचा दुजोरा दिलेला नाही.राणेंच्या वक्तव्या विरोधात शिवसैनिकांनी शहरात प्रतीकात्मक अंतयात्रा काढली होती. पोलिसांना या दरम्यान अनुचित प्रकार घडेल अशी शक्यता वाटत असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शिवसेनेने काढलेली प्रतीकात्मक अंतयात्रा जेव्हा महापालिके जवळ आली, त्यावेळी जवळच असलेल्या भाजप जिल्ह्याध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयाजवळ दोन्ही पक्षाचे कार्यकते समोरासमोर आले व संतप्त कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले. काही कार्यकर्त्यांनी यावेळी दगडफेक करत शिवीगाळ देखील करण्यात आली, राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन पालिकेसमोर करण्यात आले. यावेळी काही पोलिसांना पुतळा दहन करतांना अडवल्यामुळे आगीची आस लागून चटके लागले.पोलिसांनी वेळीच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणल्याने मोठं अनर्थ टाळला.या प्रकरणी पोलीस या घटनेत काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठवू नये, शहरात शांतात असल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: