सव्वा 2 लाखांची लाच स्विकारतांना ताब्यात…

बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील पाटबंधारे विभागात कार्यरत असलेल्या मुरलीधर भाऊराव पाटील या शाखा अभियंत्याला सुमारे 2 लाख 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील रंगावली मध्यम प्रकल्प येथे धरणाच्या बाहेरील संरक्षक भिंत आणि पुलाच्या बांधकामाचा तक्रारदाराने ठेका घेतला होता हे काम तक्रारदार यांनी पूर्ण केले असून यातील कामाचे बिल काढून देण्यासाठी वरिष्ठांना भेटून मुरलीधर भाऊराव पाटील या शाखा अभियंत्याने मदत केली तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर काम सुरू असलेल्या साईटची पाहणी करून मदत केल्याच्या मोबदल्यात शाखा अभियंता मुरलीधर भाऊराव पाटील यांनी तक्रार दाराकडून 2 लाख 20 हजार रुपयांची खाजगी कार्यालयात मागणी केली याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली होती या माहितीच्या आधारे सापळा रचून शाखा अभियंता मुरलीधर भाऊराव पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुमारे दोन लाख 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे

WhatsApp
Follow by Email
error: