त्या गुन्ह्यातील हरियाणा,गुजरात कनेक्शन उघड…

बातमी कट्टा:- इलेक्ट्रॉनिक वस्तू,वाहनांच्या स्पेअर,पार्टस व इतर वस्तू ट्रक मधून उत्तरप्रदेश राज्यातून दिल्ली मार्गे औरंगाबाद येथे घेऊन जात असतांना दिल्लीच्या अगोदर एक इसम धुळ्याला जायचे सांगुन ट्रक मध्ये बसला चालकाला गप्पा मारत विश्वासात घेत मध्यप्रदेश येथे ढाब्यावर जेवण्यासाठी थांबले व तेथे कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीराक औषध टाकुन ट्रक मधील वस्तू चोरी करुन ट्रक व चालकाला पालघर येथे सोडून दिले होते.याबाबत धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने तपास करत हरियाणा व गुजरात राज्यातील 4 संशयितांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यासह व्हिडीओ वृत्तांत बघण्यासाठी चैनल सबस्क्राईब करा

याबाबत दि 13 जुलै रोजी रामदास हरदयाल पाल यांनी दिलेल्या फिर्याद दिली होती त्यात म्हटले की,16 जुलै रोजी उत्तरप्रदेश येथील गौतम नगर येथून एच.आर.55 एल.9002 या कंटेनर मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू,वाहनांच्या स्पेअर,पार्टस व इतर वस्तू लाखोंचा मुद्देमाल दिल्लीमार्गे औरंगाबाद येथे आणत असतांना दिल्लीच्या अगोदर एक इसम धुळ्याला जाण्यासाठी वाहनात बसला चालकाशी गप्पा मारत त्याने विश्वासात घेत दोघेही मध्यप्रदेश राज्यातील शिवपूरी येथे एका धाब्यावर जेवण करण्यासाठी थांबले यावेळी त्या इसमाने चालकाला गुंगीकारक औषध मिसळून कोलड्रिंक्स दिले.तो ट्रक पुढे मध्यप्रदेश राज्यात आणत शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोल रिफायनरी कंपनीसमोर त्या वाहनाचा जिपीएस कट केला व तेथुन नवापूर मार्गे घेऊन जात वाहनातील वस्तू कुठेतरी उतरवून ट्रक व चालकाला पालघर येथे सोडून दिले.ट्रक चालकाला शुध्दीत आल्यानंतर तो पालघर येथे आला असल्याचे समजले.बेशुध्द करुन ट्रक मधील संपूर्ण मुद्देमाल चोरी झाल्याचे कळाल्यानंतर ट्रक चालकाने थाळनेर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला होता.

याबाबत धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरु केला होता.यावेळी हा गुन्हा हरियाणा राज्यातील पलवेल जिल्यातील संशयितांनी केल्याची माहिती प्राप्त झआली होती या माहिती नुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाने हरियाणा राज्यातील पालवल जिल्ह्यात जाऊन जमशेद खान दिनु खान व अब्बास युसुफ खान या दोघांना ताब्यात घेतले.त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत सदरचा चोरीचा मुद्देमाल गुजरात येथील सुरत येथे ठेवल्याचे सांगितले.पथकाने सुरत गाठत शशीकांत धरणीधर उपाध्याय व अरुणकुमार रमाशंकर पांडे दोन्ही राहणार सुरत यांना ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब सुर्यवंशी,योगेश राऊत,संजय पाटील,संदिप पाटील,कुणाल पाणपाटील,संदीप सरग,रविकिरण राठोड,रविंद्र माळी,विशाल पाटील,सुनिल पाटील,मनोज महाजन,मनोज बागुल यांनी केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: