बातमी कट्टा:- दरणे येथील तरुण डॉ प्रेमसिंग गिरासे यांचा भरदिवसा रस्त्यावर खून करण्यात आला.पोलीसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.याबाबत आज शेकडोच्या संख्येने जनसमुदाय एकत्र येत शिंदखेडा यथे मोर्चा काढत पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.
शिंदखेडा तालुक्यातील दरणे येथील प्रेमसिंग राजेंद्र गिरासे या तरुणाचा चिमठाणे रस्त्यावर दुपारी तीन वाजेच्या सुमारास खून करण्यात आला होता.याप्रकरणी पोलीसांनी खलाणे येतील तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.याबाबत आज दि 8 रोजी राजपूताना फाऊंडेशन महाराष्ट्र अध्यक्ष गिरीषसिंह परदेशी यांच्या नेतृत्वात शिंदखेडा शहरात बसस्थानक ते पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या प्रमाणात शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील जनसमुदाय उपस्थित होता.दरणे येथे भेट देऊन शिंदखेडा येथे पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढण्यात आला.
सकाळी राजपूत फाऊंडेशन महाराष्ट्रचे अध्यक्ष यांच्यासह संपूर्ण जनसमुदाय दरने येथे जाऊन डॉ प्रेमसिंग गिरासे यांच्या घरी जाऊन भेट दिली. त्यानंतर तेथून शिंदखेडा येथील बसस्थानक पासून तर पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढण्यात आला.यावेळी राजपूत समाजासह ईतर समाजाने शेकडोच्या संख्येने सहभाग नोंदवला होता.
पोलीस स्टेशन येथे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की,डॉ प्रेमसिंग राजेंद्र गिरासे यांचा निर्घृण खून करण्यात आला या घटनेतील संशयित पोलीसांच्या ताब्यात आहेत.या संशयितांवर कठोर गुन्हे दाखल करावे व सदर गुन्हा जलद न्यायालयात समाविष्ट करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी माने यांच्यासह शिंदखेडा पोलीस निरीक्षकांसह पोलीस प्राशसन उपस्थित होते.