डॉ प्रेमसिंग गिरासे हत्या प्रकरण,काय म्हटले आमदार जयकुमार रावल…

बातमी कट्टा:- शिंदखेडा तालुक्यातील दरणे येथील तरुण प्रेमसिंग गिरासे यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली होती. पोलीसांनी घटनेच्या काही तासातच तीन संशयितांना ताब्यात घेतले होते.आज दि 8 रोजी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी दरणे येथे मयत प्रेमसिंग गिरासे यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

व्हिडीओ वृत्तांत

यावेळी आमदार जयकुमार रावल यांनी कायदा व सुव्यवस्थे बाबत चिंता व्यक्त केली.यावेळी आमदार जयकुमार रावल म्हणाले की, पोलीस चौकीच्या काही किमी अंतारावरच भरदिवसा तरुणाचा अशा पध्दीने खून होणे अत्यंत निंदनीय आहे.राजकारणा पलीकडे जाऊन सर्व पक्षाने या घटनेसाठी लढा देण्याचे ठरवले आहे. या गुन्ह्याचा खटला जलद न्यायालयात करण्यात यावा यासाठी उज्वल निकम सारखे वकिल नियुक्त करण्यात यावे व पुढील 6 महिन्यात याचा निकाल लावावा अशी सर्वांची मागणी असल्याचे यावेळी जयकुमार रावल म्हणाले.यावेळी मोठ्याप्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.

व्हिडीओ वृत्तांत
WhatsApp
Follow by Email
error: