बातमी कट्टा:– शिरपूर चोपडा रस्त्यावरील हॉटेल धरती गार्डन येथे हॉटेल धरतीचे मालक तथा माजी नगरसेवक केवलसिंग राजपूत यांच्यावर प्राणघातक हल्ला करत 20 हजारांची लुट केल्याची घटना घडली.केवलसिंग राजपूत यांच्यावर धुळे येथे उपचार सुरु होता.याबाबत संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा निषेध करत शिरपूर तालुका लिकर असोसिएशन तर्फे काळ्या फिती लावून निवेदन देण्यात आले.
शिरपूर येथील माजी नगरसेवक केवलसिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,केवलसिंग राजपूत यांची शिरपूर चोपडा महामार्गावर अजनाड शिवारात धरती गार्डन हॉटेल आहे. ते दि 5 रोजी रात्री हॉटेल वर असतांना तेथे रात्री 9 वाजेच्या सुमारास राहुल पाटील हा तेथे दारु पिण्यासाठी व जेवण्यासाठी आला होता.दारु पिऊन जोरजोराने ओरडत आसल्याने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला असता त्याने वेटर भैया पाटील याला शिवीगाळ केली.हॉटेल मँनेजर व मालक केवलसिंग राजपूत यांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला.मात्र राहुल पाटील याने केवलसिंग राजपूत यांना धमकवत हॉटेलच्या बाहेर गेला.
रात्री हॉटेल मालक केवलसिंग राजपूत घरी जाण्यासाठी निघाले असता 7-8 जणांनी त्यांना अडवले व मारहाण करत खिशातील 20 हजार काढून घेतले तर शिवीगाळ करून जिवेठार मारण्याची धमकी दिली.या घटने दरम्यान मँनेजर सुनिल पाटीलसह भगवान भिल,सुनिल वंजारी,भगवान पाटील यांनी केवलसिंग राजपूत यांना त्यांच्या तावडीतून सोडवले.जखमी आवस्थेत केवलसिंग राजपूत यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.केवलसिंग राजपूत यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातून धुळे येथील श्री सिध्देश्वर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.केवलसिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन योगेश पाटील, राहुल सोनवणे,सुनिल पाटील, प्रशांत शिंपी,आप्पा पाटील यांच्यासह दोन अनोळखी जणांवर थाळनेर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर काल दि 8 रोजी करनी सेनेतर्फे पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत यांना निवेदन देण्यात आले.तर थाळनेर येथे पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले होते.माजी नगरसेवक केवलसिंग राजपूत यांच्या वर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज शिरपूर लिकर व्यापारी आसोशिएन तर्फे पुर्ण दिवसभर व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबत लिकर असोसिएशनतर्फे काळ्या फिती लावून उपविभागीय पोलीस अधिकारी व थाळनेर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले आहे.संशयितांची चौकशी करून तात्काळ अटक करावी असे निवेदनात म्हटले आहे.