बातमी कट्टा : देशसेवेसाठी ग्रामीण भागातुन व सामान्य परिवारातून अनेक अधिकारी आले आहेत.तर जिल्हाधिकारी, पाेलिस अधिक्षक यासारखे अनेक माेठी पदे भूषवित आहेत. याेग्य नियोजन, जिद्द, चिकाटी, मेहनत व वेळेचे याेग्य व्यवस्थापन करून अभ्यास केल्यास स्पर्धा परिक्षेत यश संपादन करून करियर घडविता येते. तर आयुष्यात माेठे स्वप्न पाहिल्याशिवाय माेठे हाेता येत नाही. माेठे स्वप्न पहा, ध्येय आखा ते साकार करण्यासाठी कष्ट घ्या! जिवनात कधीही न्युनगंड बाळगु नका. राेज नविन शिकण्याची तयारी ठेवा. प्रश्न पडल्यावर कुठलाही कमी पणा न बाळगता त्या विषयावरील तज्ञांकडून उत्तर शाेधुन घ्या! जीवनात पुस्तकी ज्ञानासाेबत वास्तविक ज्ञान सुध्दा महत्वाचे आहे. तर जे विद्यार्थी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असतील त्यांना सर्वताेपरी मदत करण्याची तयारी माझी आहे. अनेक विद्यार्थी शैक्षणिक शुल्क भरू शकत नसल्याने शिक्षण साेडतात अशा लोकांना देखील मदतीची माझी तयारी आहे. जिवनात शिक्षणाला महत्व असुन कितीही कष्ट उचलावे लागले तरी शिक्षण करा चांगले नागरिक घडा व देशसेवा करा असे प्रतिपादन सहाय्यक पाेलिस निरीक्षक उमेश बाेरसे यांनी केले.
पिंप्री ता. शिरपुर येथील सामाजिक सभागृहात आज दि.११ रोजी, सांयकाळी ७ वाजता, नवयुवक गणेश मंडळाची कायदा, सुव्यवस्था या विषयावर थाळनेर पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक उमेश बाेरसे यांनी बैठक घेतली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमेश बाेरसे हाेते. तर व्यासपीठावर पाेलिस उपनिरीक्षक मनाेज कुवंर, पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे, कळमसरे येथील सामाजिक कार्यकर्ते महिपाल सिसाेदिया, ग्रामपंचायत सदस्य रणजित गिरासे आदी उपस्थित होते. यावेळी मंडळाकडून स. पाे.नि.उमेश बाेरसे यांना गणपती आरतीचा मान देण्यात आला.
पुढे श्री. बाेरसे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, काेराेना सारखी जागतिक महामारीचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून शासनाने गणेश उत्सव साजरा करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्याबाबत थाळनेर पाेलिस ठाणे येथे मिटींग प्रसंगी हद्दीतील प्रत्येक गावातील मंडळांना माहिती दिली आहे. मात्र तरी देखील प्रत्येक गावात सुज्ञ नागरिकांनी जनजागृती करणे गरजेचे आहे. यावर्षी विर्सजन मिरवणूक काढता येणार नाही. तर डि. जे., बॅन्ड सारखे कुठलेही वाद्य लावता येणार नाही. यासह बरीच नियमावली असुन प्रत्येक गावाच्या पाेलिस पाटील यांच्या माध्यमातून सर्व मंडळांना माहिती दिली आहे. सर्वांनी कायदा सुव्यवस्था, सामाजिक सलाेखा, काेराेना नियमांचे पालन करून उत्सव साजरा करायचा आहे. ज्या मंडळाकडून कायद्याचे पालन केले जाणार नाही. त्यांच्यावर कुठलीही गय न करता कायदेशीर कार्यवाही केली जाईल. याची सर्वांनी नाेंद घ्यावी अशी सुचना देखील श्री. बाेरसे यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंडीत पाटील, संजय काेळी, मनाेज राजपूत, अरविंद काेळी, भिका काेळी, नरेंद्र काेळी, महेंद्र धनगर यांच्यासह मंडळाच्या युवकांनी परिक्षम घेतले.
तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे यांनी केले.