बातमी कट्टा:- नंदुरबार तालुक्यातील बलदाणे गावाचे सामाजिक कार्यकर्ते, डी.एम.जी. हाय. व ज्युनिअर कॉलेज विसरवाडी येथे प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले हर्षदिप दिवाणसिंग सोलंकी यांना यंदाचा मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे दिला जाणारा कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार नुकताच ऑनलाईन प्रदान झाला.
त्यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असुन त्यांनी गावात स्वखर्चाने बसण्याचे बाक दिले आहेत, गावाला जोडणारे रस्ते स्वतः पाठपुरावा करून केले आहेत, तसेच ते मागील 4 वर्षापासून उपजिल्हा रुग्णालय, मतिमंद शाळा येथे अन्नदान करत आहेत, त्यांनी कमी वयात विविध राज्यस्तरीय पद देखील भूषविली आहेत. यांचीच दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान झाला आहे. ते दोंडाईचा बाजार समितीचे लिपिक दिवाणसिंग ठाणसिंग राजपुत यांचे पुत्र आहेत. त्यांचे गावकऱ्यांकडून कौतुक होत असुन संस्थेचे अध्यक्ष मा. भरतजी माणिकराव गावित यांनी देखील विशेष कौतुक केले आहे.