बातमी कट्टा:- मोटरसायकलीने जाणाऱ्या 55 वर्षीय व्यक्तीला अज्ञात अवजड वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटन घडली आहे.एकाच आठवड्यात दरणे येथील दोन जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार चिमठाणे सोनगीर मार्गावर शिंदखेडा तालुक्यातील दराणे येथील राजाराम दौलत कोळी वय 55 हे आपल्या मोटरसायकलीने दराणे येथून चिमठाणे येथे जात असतांना अज्ञात अवजड वाहनाने धडक दिली.यात राजाराम कोळी हे रस्त्यावर कोसळले.त्यांच्या डोक्याला जब्बर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी चिमठाणे व दराणे येथील नागरिक दाखल होत मदत कार्य सुरु केले व पोलीस प्रशासनाला माहिती कळवली याबाबत शिंदखेडा पोलीस स्टेशनात अज्ञात अवजड वाहन चालक विरुध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दराणे येथे याच आठवड्यात डॉ प्रेमसिंग गिरासे यांचा खून झाल्याची घटना घडली होती.यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली होती तर आज दराणे येथील शेतकरी राजाराम कोळी यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.दराणे गावातील एकाच आठवड्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.