बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे आता कुठेतरी पाऊस थांबल्यावर मातीचे घर कोसल्याची घटना जुने भामपूर येथे घडली यामुळे मजुर कुटुंब उघडल्यावर आले असल्याची घटना दुपारी घडली घडली आहे.दरम्यान याबाबत माहीती देऊनही पीडित कुटुंबाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. कदाचित तालुक्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन येणार असल्याने संबधित राजकारणी आणि अधिकारी व्यस्त असावेत असे बोलले जात आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु होती दरम्यान काल शुक्रवारपासून रिपरिप बंद झाली मात्र मातीच्या घरांना आता जास्त धोका वाढला आहे. त्यात आज तालुक्यातील भामपूर येथे हातावर कुटुंबाचे पालनपोषण करणाऱ्या कैलास दगा पाटील यांचे संपूर्ण घर दुपारी अचानक कोसळले आहे.कुटुंबात पतिपत्नी व दोन मुले असा परिवार आहे. मात्र सकाळी मुले व पत्नी मजुरीसाठी कामाला गेले होते व कैलास पाटील हे घरात असतांना अचानक घर कोसळले.सुदैवाने कैलास पाटील यांना मुकामार लागला परंतु अन्न धान्य पुर्णतः मातीत मिसळल्याने व डोक्यावर छप्पर नसल्याने पाटील कुटुंबासह उघडल्यावर आले आहेत.घटनेची माहिती संबधीत राजकीय मंडळींना व अधिकारींना देण्यात आली मात्र कोणीही या गंभीर घटनेकडे ढुंकूनही बघितले नाही. कदाचित तालुक्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राजकारणाचे चाणक्य गिरीश महाजन येणार असल्याने त्यात व्यस्त असावेत म्हणून कोणीही पीडित कुटुंबाकडे ढुंकूनही बघीतले नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.