बातमी कट्टा:- शहरातील करवंद रस्त्यावर पेट्रोल पंपसमोर टी.एम.सी शेडच्या बाजूला मंगळवारी अज्ञात व्यक्तिचा मृतदेह आढळून आला असून सदर व्यक्तीची उशिरा पर्यंत माहिती मिळून आली नाही. याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातील वार्डबॉय खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील करवंद रस्त्यावर पेट्रोल पंपसमोर टी.एम.सी शेडच्या बाजूला आवारात अंदाजे 40 वर्षीय अनोळखी व्यक्ती मयतावस्थेत असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे ,विकास सेन,श्रीरामचंद्र येशी यांनी शिरपुर शहर पोलिसांना ही दिली.दरम्यान शहर पोलिस ठाण्याचे पोना कुंदन पवार व इतर कर्मचारी दाखल होत पाहणी केली तसेच पंचनामा केला.सदर अनोळखी मयतावस्थेत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात अम्ब्युलन्सने दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.याप्रकरणी वार्डबॉय च्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.सदर अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची अद्याप ओळख झाली नसल्याचे पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे.पुढील कार्यवाही शहर पोलिसांकडून सुरु आहे.